Tuesday, 2 April 2019

नियती आपली रोज परिक्षा घेते...

सध्याचं युग हे माहिती व तंत्रज्ञानाचं युग आहे. आज प्रगत तंत्रज्ञानामुळे जगात घडणारी कोणतीही गोष्ट आपल्या जवळ क्षणात पोहोचते. ही गोष्ट चांगली व आपल्या फायद्याची असली तरी तिचे अनेक तोटेही आहेत. याच तंत्रज्ञानामुळे संध्याचं जग फास्टही झाले आहे. आधी घड्याळ एकाद्याकडेच असायचे पण वेळ मात्र सगळ्यांकडे असायचा. आज घड्याळ सगळ्यांकडे आहे, मात्र वेळ कुणाकडेच नाही. जो तो फक्त आपापल्या प्रपंचात इतका व्यस्त आहे, की इतरांसाठी सोडा स्वत:साठीही व्यक्तीकडे आज पुरेसा वेळ नाही.
या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आपले धैर्य, संयम सुटत चालला आहे. आज सर्वजण फार उतावीळ झाले आहेत. घटना काय घडली आहे, याच्या पूर्ण तपशिलात न जाता, त्यावर चिंतन न करता आज सर्वजण फक्त ब्रेकिंग न्यूज बघुन उतावीळ होतात. याच्या खूप सा-या परिणामांपैकी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे कष्ट करण्याची, सहन करण्याची अंगी क्षमता, गुण असूनही आपली मानसिकता नसते. त्यामुळे भलतंच काही होऊन बसतं. हा बदल आपल्यात झालेला आहे. प्रकृती किंवा नियतीमध्ये हा बदल झालेला नाही. नियती तिचं काम बरोबर करते. नियती आपली रोज परिक्षा घेत असते. आपण मात्र त्या परिक्षेचा बाऊ करुन घेतो.
अशीच एक घटना घडली. अत्यंत साधी, स्वाभावीक व प्रत्येकाच्या आयुष्यात काही वेळेला घडतेच अशी घटना होती. परिचितांमधील एका महिलेचा मला फोन आला. म्हणाली, मला तुम्हाला भेटायचं आहे.
म्हटलं ठिक आहे, उद्या येऊन जा भेटायला. कारण त्या दिवशी मला बाहेर थोडं काम होतं व इतर वेळ मी दुस-यांना दिलेला होता.
ती म्हटली, नाही आजच तातडीने भेटायचं आहे. उद्या खूप उशिर होऊन जाईल. तोपर्यंत मी राहूच शकत नाही.
मी म्हटलं, का गं काय झालं एवढं? तर ती म्हटली, ते भेटल्यावरच सविस्तर सांगेल. पण मी खूप टेंशनमध्ये आहे. माझं चित्त लागत नाही आहे. त्यामुळे तातडीने तुम्हाला भेटून मला त्यावर उपाय पाहिजे.
मी म्हटलं, ठिक आहे. ये दुपारी भेटायला. ती दुपारी येणार असल्यामुळे मला बाहेरची जी कामे होती ती त्या दिवशी रद्द करावी, लागली.
ठरल्याप्रमाणे ती वेळेआधीच ऑफिसला आली. माझ्याकडे आधीच एक महिला बसलेली होती. त्यामुळे माझ्या कॅबिनच्या समोरच असलेल्या खुर्चीवर ती बसली. आता आपण वेळेच्या आधी आलेलो आहोत, तर थोडं शांततेन बसलं पाहिजे. माझ्या ऑफिस बॉयने तिला पाणी प्यायला दिलं. तिने पाणी घेतलं आणि त्याला म्हणाली, मॅडमांना सांग मी आलीय म्हणून. आता त्याला माहिती आहे, की ऑफिसमध्ये कोण येतंय आणि कोण जातंय हे काचेतून सगळं बघते. त्यामुळे त्याने तिला तिथेच सांगून टाकले, तुम्ही थोडं बसा .मॅडम बोलवतील तुम्हाला आतमध्ये!
बरं समस्या अशी की माझ्याकडे येणारा प्रत्येकजण समस्या घेऊन आलेला असतो. त्या विषयी गुप्तता पाळली जावी अशी त्याची इच्छा असते आणि ती मला पाळावीही लागते. कारण तसे केले नाही तर माझ्याकडे कोणी व्यक्तच होणार नाही. म्हणून मी तिला कॅबिनमध्ये बोलवू शकत नव्हते.
तिची चलबिचल मात्र मला काचेतून दिसत होती. पाच मिनिटे बसल्यानंतर ती सरळ उठून कॅबिनमध्ये आली. माझ्या समोर बसलेल्या महिलेला बघुन मात्र तिला थोडं अवघडल्यासारखं झालं. तरीही म्हणाली, स्वॉरी हं ताई मी सरळ आतमध्ये आले.
मी म्हटलं काही हरकत नाही. या बसा. तशी ती पटकन बसली. त्यामुळे ज्या महिला माझ्याकडे आधीपासून बसलेल्या होत्या त्यांना मी सांगितलं, की आपण उद्या ठरलेल्या वेळी भेटूया. असं बोलून मी त्यांना निरोप दिला.
त्या महिला कॅबिनच्या बाहेर गेल्याही नसतील, की हिने तिची व तिच्या नव-याची पत्रिका माझ्या पुढ्यात टाकल्या व म्हणाली ताई बघा हो, आमचे ग्रह असे अचानक कसे फिरले. काय चुक घडली आहे आमच्या हातून की असा प्रसंग आलाय.
काय झालंय? असं मी तिला विचारण्याची तिची अपेक्षा होती. मी मात्र त्या दोन्ही पत्रिकांचा अभ्यास करायला लागले. मी काही बोलत नाही म्हटल्यावर मग तिनेच बोलायला सुरुवात केली. तसं मी तिला थांबवलं. म्हटलं मला आधी पत्रिका बघु द्या.
दोघांच्याही पत्रिका अत्यंत उत्तम व राजयोग कारक होत्या. फक्त १८ महिन्यांचा कठिण कालखंड सुरु झालेला होता. तो संपल्यानंतरही सर्वकाही उत्तमच होतं. दोन्ही पत्रिका पूर्णपणे बघुन झाल्यानंतर मी तिला म्हणाले, बोला काय समस्या आहे तुमची.
नाईलाजाने संयम ठेवून शांत बसलेली ती महिला एकदम सुसाट बोलू लागली. अहो, ताई काय सांगू तुम्हाला, काल यांची नोकरी सुटली हो. संध्याकाळी घरी येऊन जेव्हा ह्यांनी ही गोष्ट मला सांगितली तेव्हापासून तर माझे चित्तच उडाले आहे. रात्री जेवण तर गेलेच नाही पण रात्रभर झोपही लागली नाही. नको नको ते विचार मनात सतत येत आहेत. आता कसं होणार आमचं. कृपा करुन मला यावर काही उपाय सांगा हो.
मी म्हटलं, अहो, एवढ्याशा गोष्टीने तुम्हाला एवढं घाबरायला का होतंय? नोकरी सुटली ही काही फार मोठी गोष्टी नाही. तुमचे पती शिकलेले आहेत, हुशार आहेत. एक नोकरी सोडली तर त्यांना दुसरी नोकरी मिळेलच ना! ते आता आयुष्यभर घरीच थोडे बसणार आहेत.
पण लगेच मिळेल का दुसरी नोकरी! तिचा लगेच प्रश्न. मी म्हटलं, हा काय ज्योतिषाला विचारायचा प्रश्न झाला का? आधी तुम्हाला तुमच्या नव-यावर विश्वास असायला हवा. त्यातही ही वेळ दुसरी नोकरी मिळेल की नाही यावर विचार करायची नक्कीच नाही. हा विचार तुमचे पती करीतच असतील. तुम्ही यावेळी त्यांच्यावर विश्वास दाखवायला हवा. त्यांना गरज नसली तरी धीर द्यायला हवा, की एक नोकरी सुटली म्हणून काय झालं? आता यानिमित्ताने मस्तपैकी काही दिवस घरी आराम करा. तेवढाच मला तुमच्यासोबत जास्त वेळ सोबत राहायला मिळेल. मग काही दिवसांनी दुसरी नोकरी आपण शोधुया.
हे करायचे सोडून तुम्ही जर असं घाबरायला लगलात तर त्यांनी काय करायचं? मग मी तिला समजावून सांगितले, की तुम्हा दोघांच्याही पत्रिका अगदी उत्तम आहेत. फक्त १८ महिन्यांचा कठिण कालखंड जो सुरु झालेला आहे. त्यामुळेच तुमच्या पतीची नोकरी सुटलेली आहे. येणारे १८ महिने तुम्हाला थोडा त्रास सहन करावाच लागणार आहे.
आयुष्य म्हटलं, की चढ-उतार आलेच. संघर्ष कोणालाही सुटलेला नाही. नियती तुमची परिक्षा पाहत आहे. त्या परिक्षेला तुम्हाला सामोरं जावंच लागेल आणि गृहिणी म्हणून, अर्धांगिनी म्हणून अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या नव-याच्या पाठिशी ठामपणे उभं राहावंच लागेल. बरं तुमची परिस्थितीही काही वाईट नाही. स्वत:चा फ्लॅट आहे, गाडी आहे. बँकेत काही बचत केलेले पैसे असतील. सासु-सास-यांची मदतही होईल. मग इतकी काळजी कसली करताय?
माझ्या मते मी त्या महिलेला पूर्णपणे समजावलेलं होतं. ती निघुन गेली. मात्र माझ्या डोक्यात वेगळेच विचार सुरु झालेत. लोक इतके नियतीच्या परिक्षेला सामोरे जाण्याच्या आधीच घाबरु कसे शकतात? पूर्वीच्या काळी स्त्रीयांमध्ये अत्यंत संयम व सहनशीलता होती. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे अन्नधान्याच्या टंचाईतही महिला १० ते १२ जणांचा परिवार कुठलीही तक्रार न करता अतिशय उत्तमरीत्या चालवित असत. आज परिवारांची विभागणी होऊनही, स्वतंत्र मनासारखं जगण्याची मुभा असूनही आपले धैर्य खचले आहे. म्हणूनच नियतीच्या परिक्षांना सामोरे जाण्याची आपल्याला भिती वाटत राहते, हेच खरे!

।। शुभम भवतू ।।

ज्योतिष भास्कर सौ ज्योती जोशी
"श्री " वैदिक आणि सायंटिफीक ज्योतिष संशोधन केंद्र , जळगाव मो .नं 9850098688 ( whatsup only )

Wednesday, 27 March 2019

मोठी बातमी :- शेवटी कॅन्सरवर उपचार सापडला, फक्त ४८ तासांत नायनाट होणार कोणत्याही स्टेज च्या कॅन्सरचा .

मोठी बातमी :- शेवटी कॅन्सरवर उपचार सापडला, फक्त ४८ तासांत नायनाट होणार कोणत्याही स्टेज च्या कॅन्सरचा .

कॅन्सर एक असा आजार आहे, ज्याचे नाव ऐकू भल्याभल्यांना घाम फुटतो. सामान्यतः ह्या आजाराबद्दल असे मत आहे की, तो झाला की त्यावर उपचार अशक्य आहे. एकतर कॅन्सर वर ठोस उपचार उपलब्ध नाही आणि जे आहेत ते इतके त्रासदायक आहेत की, पीडित व्यक्तीला ते सहन करणे शक्य नाही. सहसा कॅन्सरवर उपचार म्हणून केली जाणारी केमोथेरपी आजार ठीक करण्याऐवजी पीडितच्या मृत्यूचे कारण बनते. अशात अमेरिकेत एका शोधात असे समोर आले की, कॅन्सरसारखा गंभीर आजार प्रकृतीकपणे ठीक होऊ शकतो. ही नैसर्गिक गोष्टी अशी आहे की, ती खाल्ल्यानंतर 48 तासांतच असर दिसायला लागतो.
रिसर्च मध्ये झाला मोठा खुलासा :- नुकताच कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मध्ये कॅन्सरच्या रुग्णांवर शोधात ह्या गोष्टीचा खुलासा झाला की, कॅन्सरच्या रुग्णाला द्राक्षांचा बियांचा रस प्यायला दिल्यास वेगाने सकारात्मक परिणाम दिसू लागतात. कॉलेज के मेडिकल फिजिक्स एवं साइकोलॉजी के सीनियर प्रोफेसर डॉ.हर्डिन बी जॉन्सनी एका वाटर्मनपत्रात सांगितले की, जवळपास 25 वर्षांपासून चाललेल्या शोधात असे समोर आले की, द्राक्षाच्या बियांपासून निघणारा रस या आजारावर फार वेगाने काम करत आहे. त्यांनी सांगितले की, हा रस इतक्या वेगाने असर करतो की 48 तासांतच त्याचे परिणाम आमच्या समोर यायला लागले होते.
एक्सपर्ट्सचे म्हणणे काय आहे ? :- भोपाळच्या एका खाजगी हॉस्पिटल मधील चिकित्सक डॉ. नाजीम अलींनी सांगितले की, ही गोष्ट एकदम खरी आहे. द्राक्ष खायला जितके चविष्ट असतात तितकेच त्याचे फायदेही आहेत. त्यांनी सांगितले की, यात स्वस्थतेशी जुडलेले अनेक रहस्ये आहेत. जर याची माहिती माणसाला झाली तर तो कॅन्सरच नाही इतर अनेक गंभीर आजारापासून आपली सुटका करून घेऊ शकतो.
पुढे ते सांगतात की, यात पर्याप्त मात्रामध्ये कॅलोरी, फायबर, व्हिटॅमिन सी आणि ई आढळून येते. यात ग्लुकोज, मागेन्शियम आणि सायट्रिक ऍसिड सारखे पोषक द्रव्ये पण उपलब्ध असतात. ते गंभीर आजार जसे कॅन्सर, किडनी समस्या, पिलिया यात आराम देण्यात असरदार मानलं जातं. चिकित्सक रुग्णाला याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात.

प्रोफेसर डॉ. हर्डीन यांनी शोधात बघितले की, द्राक्षाच्या बियाणांचा अर्क लुकिमिया म्हणजेच ब्लड कॅन्सरमध्ये फार असरदार ठरले आहे. द्राक्षाच्या बियांमधील जेएनके प्रोटीन कुठल्याही साईड इफेक्ट्स विना कॅन्सरच्या पेशी 78% पर्यंत मुळापासून निष्क्रिय करण्यात असरदार ठरल्या आहेत. चिकित्सकाच्या सल्ल्यानुसार याचे सेवन केल्यास केवळ 48 तासांतच कॅन्सर नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते.

आतापर्यंत आपल्याला माहीत होते द्राक्षाच्या बियांचे तेल आरोग्यासाठी फायद्याचे असते. यात असणारे पोषक द्रव्ये जेवणाला स्वस्थवर्धक बनवतात. यात फॅट नसते आणि व्हिटॅमिन ई आढळून येते आणि हे एक उत्तम अँटी ऑक्सिडंट असते. आता आपण द्राक्षाच्या बियांचा एक मोठा फायदा जाणून घेतला आहे. याने 48 तासांत कॅन्सरवर नियंत्रण ठेवता येते. याचे इतकेच नाही तर इतरही अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊ त्याबद्दल.

द्राक्षांत ग्लूकोज, मैग्नीशियम आणि साइट्रिक ऍसिड सारखे पोषक द्रव्ये आढळून येतात. अनेक आजारात द्राक्षाच्या सेवन करणे फायद्याचे ठरते. टीबी, कॅन्सर आणि ब्लड इन्फेक्शन यावर प्रामुख्याने असरदार ठरतं.
 मधुमेह रुग्णांसाठीही द्राक्ष फार फायदेशीर ठरतात. हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. याशिवाय हे आयर्नचे ही चांगले स्रोत असतात.
मायग्रेनच्या दुखण्याने त्रस्त लोकांनी द्राक्षांचा रस पिणे फायदेशीर ठरत. काही काळ नियमितपणे द्राक्षांचा रस पिल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते.
स्तनांच्या कॅन्सरवर लाभदायक :-नुकत्याच एक शोध लागला की, स्तनांचा कॅन्सरवर रोक लावण्यास द्राक्षाचे सेवन फायदेशीर ठरते. याशिवाय हृदयासंबंधीत आजारांवर पण विशेषतः फायदेशीर ठरते.
रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी एक ग्लास द्राक्षाच्या रसात 2 चमचे मध टाकून पिल्याने रक्ताची कमतरता भरून निघते. याने हिमोग्लोबिन पण वाढतात. माहिती आवडली असेल तर आमुचे पेज लाईक करायला विसरू नका आणि माहिती जास्तीत जास्त शेअर करा काय सांगता येते तुमच्या एका शेअर ने हि माहिती कुणाला उपयोगी पडू शकते .

Saturday, 23 February 2019

*।। श्री स्वामी समर्थ ।।* *प.पु.गुरुमाऊली म्हणतात,*

*।। श्री स्वामी समर्थ ।।*

*प.पु.गुरुमाऊली म्हणतात,*

*वेळ दुपारी १२ ते १२ः३० या वेळेत  दत्तप्रभुंची भिक्षा मागायची वेळ असते .*
*म्हणून  या नियमित वेळेत केलेले दान हे कोणत्याही मार्गाने थेट दत्त प्रभूंच्या च झोळीत पडते.*
*कारण, आपल्याला माहिती नसते की  , दत्तप्रभू कधी कोणत्या रूपात आपल्या समोर झोळी घेऊन येतील आणि भिक्षा मागतील.*
*माऊलींच्या मते, आपण जी भिक्षा प्रभूंच्या झोळीत घालातो ती भिक्षा  नसून आपले दुःख दारिद्रय  असते .*
*आणि हेच आपले दुःख दारिद्रय  दत्तप्रभू हसत हसत त्यांच्या झोळीत घेतात*
*म्हणून  या वेळात दान करने शक्यतो टाळू नये🙏*

*🌹🙏🏼प.पु  गुरुमाऊली 🙏🌹*

Sunday, 23 December 2018

*🥗#अन्नावर_कधी_राग_काढू_नये...🥗*

🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉

*🥗#अन्नावर_कधी_राग_काढू_नये...🥗*

ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट. माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात.

*घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे #अन्नाचा_अपमान.....*

एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच राहते.
*अन्नाचा म्हणजे #अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते.*

■ घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या.

■ शत्रू जरी काही खात-पीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका.

■ अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो.

■ एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते.

■ मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये.

■ घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात.

■यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे.

■ मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते.

■ अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो.

■ अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात अन्न पुरवणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात. त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणे-पिणे करू नये.

■ मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही #शांतपणे खात नसाल तर त्या #राबण्याचा उपयोग काय?
अन्नाच्या नासाडीने #अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात.

■ #ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. 'अतिथी देवो भव' ही म्हणही त्यासाठीचा वापरतात. #पशुपक्ष्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकटे येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो.

■ #अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत राहते. स्वतःची #अध्यात्मिक_शक्तीही वाढते...!!
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🌺🌺  अन्नपूर्णा माता नमो नम:🌺🌺🙏

Sunday, 9 December 2018

मृत्यू ही एक आनंदमय यात्रा !!!

मृत्यू ही एक आनंदमय यात्रा !!!

मनुष्याला आपल्या जीवा बद्दल अतिशय प्रेम असते ! थोड्याफार वेदना कष्टाने लाहीलाही होतो काही वेळा परमेश्वराला सुध्दा शिव्या देण्यात मागेपुढे बघत नाही  इतरांना तुच्छ मानणारे काही महाभाग तर अतिशय आपल्या जीवाला जपतात !!! भगवंताचे नाम घेण्यासाठी ही त्याला कष्ट वाटतात तो म्हणतो सहज व्हायला पाहिजे !! सहज होण्यासाठी देखील आपल्या मनाला त्या दिशेने कामाला लावावे लागते तरच सहज योगा घडतो
आजच्या या लेखात मृत्यू विषयी जाणुन घेऊ !!!अनेकांना एकच भ्रांत पडलेली असते ती म्हणजे भविष्यात काय होईल!!थोडाफार  मना विरुध्द घडना घडू लागले कि लगेचच आपले भवितव्य कसे होणार याच भितीने अनेकांना भविष्य जाणुन घेण्याची इच्छा निर्णायक होते मग तो अनेकांना आपले भविष्यकाळात काय होईल विचारण्यास सुरुवात करतो  
मनुष्य मृत्यूला फार घाबरतो !!! मृत्यू हा अनेक प्रकारामुळे होतो कोणी उंचावरुन पडुन कोणी गाडीखाली चेंगरुन कोणाचा खुन होऊन कोणी आजारी पणामुळे कोणी पाण्यात पडुन कोणी अग्निने भाजुन मरतो कोणी विजेमुळे कोणी श्वास कोंडल्याने कोणी गुदमरुन कोणी शाररिक दुखण्यामुळे कोणा जनावरामुळे विषामुळे असे प्रकारात अतिशय भयंकर वाटणारा मृत्यू कसा असतो? तो केव्हा येतो याचे परमेश्वराने अतिशय सुरेख यंत्रणाच उभी केलेली आहे ही यंत्रणा माणसाला सर्व काही अगोदरच संकेत स्वप्नं दृष्टान्तातून दाखवतो परंतु सामान्य माणासाला त्या खुणा कळुन येत नाही किंवा त्याची ओळख आपल्याकडे नसते त्यामुळे तो मनुष्य भिनदास्त होतो
मृत्यू जवळ येऊन टेकतो तरी याचा पुर्णपणे दुर्लक्ष होते त्यामुळे तो सजक राहत नाही !
मृत्यू समयी माणसाचे सहावे इंद्रिये जागृत अवस्थेत येते व शरारातील पाच इंद्रियांचे काम बंद पडते त्यामुळे संपुर्ण अंधारात शरीर हरवुन जाते त्यामुळेच सारे जग डुबल्या सारखे होते आपण ज्या वेदने मुळे मृत्यू होत असतो त्यावेळी शरीरातील आत्मा केवळ ओरडत राहतो त्याला वाटते कोणीतरी मला वाचविण्यासाठी तरी येईल पण त्याला कळतच नाही आपला मृत्यू झालाय!! तो नुसता त्या अंधा-या कोठणीत शोधत राहतो कोणीतरी येईल या संकटातुन बाहेर काढेल!!! हीच आशा त्याला लागलेली असते त्याला कळत असते मी मोठ्याने ओरडत आहे पण त्याला दिसत नसते बाहेरील काहीही ऐकू येत नसते जे काही असते ते गर्द अंधार आहे मी आत्ता मरणार हे त्याला कळत असते त्या भितीने तो जोरजोराने ओरडत असतो पण त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाला देखिल त्याचे ओरडणे ऐकू येत नाही तो आता फक्त आत्मा बननुन राहिलेला असतो त्याचा स्थुल शरीर त्याला दिसत नाही त्या स्थुल शरीराचा स्पर्श देखील जाणवत नाही यालाच मृत्यू अवस्था म्हणतात या अवस्थेत स्थुल जगताचा संपुर्ण संबंध संपुष्टात येतो त्याला सर्व कळत असते पण त्याला स्थुल जगातील कोणताही संदेश त्याला ऐकू येत नाही संपुर्ण काळोखात एकटाच असल्यामुळे त्याला काय करावे कळत नाही अश्या वेळेस शांत होऊन फक्त देवा मी मेलो रे वाचव मला असे म्हणातच क्षणी तो दिव्य प्रकाश दिसु लागतात व पुन्हा स्थुल जगताचा संबंध येतो व सारे सखेसंबंध आपल्या भोवती असे गोळा का झालेत तो वेड्यासारखा स्वतःला व लोकांना डोळे भरुन पाहतो पण मृत्यू भोगल्यामुळे तोच अनुभवाने सांगू  शकतो मृत्यू हा आनंदाचा क्षण आहे या मृत्यू समयी मनुष्याच्या सर्व इंद्रिये वरील ताबा नष्ट झाल्याने तो निसर्ग आपल्याकडे घेतो त्यामुळे तुम्हाला कोणत्याही वेदना होत नाही अचानक काळोखात विलिन झाल्यावर आत्मा घाबरतो त्यामुळे त्याच्या शरीराच्या हालचाली दिसतात पण मृत्यू मधून वाचल्यानंतर मात्र अंत्यंत वेदना सहन कराव्या लागतात शरीर विद्रुप सुध्दा होऊ शकते म्हणूनच अनेक संत सांगतात अरे बाबांनो त्या भगवंताच्या अडवणीत जगा तोच मोक्षाचे व्दार आहे या संकटातून सर्वांना जावे लागते  कोणी टिकतो कोणी अंनंत ब्रम्हाडांत भटत राहतो मृत्यू समयी ज्या विचारात राहतो त्याचाच शोध घेत  फिरत राहतो ज्या क्षणी भगवंताचे आडव होतो तेव्हाच त्या काळोख्या पेटा-यातून सुटका करुन घेता !!!!
याचे अनुभव स्वतःला अनुभव घ्यायचे असल्यास गर्द अंधार असलेल्या रुम मध्ये एकटेच बसा अंधार पडल्यानंतर तुमचे शरीर तुम्हाला डोळ्याला दिसले नाही पाहिजे कोणताही आवाज येता कामा नये फक्त १० मिनिटात तुम्हाला स्वतःची ओळख होईल ! आत्मा काय आहे ? शरीर काय आहे? स्थुल काय सुक्ष्म शरीर काय याची ओळख तत्काळ तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही !!!!

Thursday, 6 December 2018

खुपच सुरेख मेसेज आला आहे कोणाचा आहे माहित नाही चांगला आहे यासाठी शेयर करीत आहे

खुपच सुरेख मेसेज आला आहे कोणाचा आहे माहित नाही चांगला आहे यासाठी शेयर करीत आहे
Khup chan aahe nakki  vacha ..
देवाशी संवाद ............

माणूस :  देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का?

देव :  विचार ना.

माणूस :  देवा, माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास. असं का केलंस तू देवा?

देव :  अरे काय झालं पण ?

माणूस :  सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .

देव :  बरं मग ?

माणूस :  मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा  मिळाली .

देव :  मग?

माणूस  :  आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण  बेकार होतं .

देव :  (नुसताच हसला )

माणूस :  मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .

देव :  बरं मग

माणूस  :  संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती.मी इतका थकलो होतो की ए .सी. लावून झोपणार होतो .
का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?

देव :  आता नीट ऐक .
        आज तुझा मृत्यूयोग होता. मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला. त्या गडबडीत अलार्म पण थांबला .

तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .

कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती. ते  सँडविच वर निभावलं.

तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता.

संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .

माणूस :  देवा मला क्षमा कर .

देव :  क्षमा मागू नकोस. फक्त विश्वास ठेव. माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस . आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला

आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो.
मग *श्रवणाच्या* वेळी डुलक्या का येतात ?
तीन तासाच्या पिक्चर मध्ये जराही झोप येत नाही. ...

आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि
नको ते मेसेज फॉरवर्ड करतो.....

      देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं

माणूस हा सवडीनुसार ,वागत असतो...!

चहात माशी पडली तर चहा फेकून देतो,

पण साजूक तूपात माशी पडली तर तो
         माशी फेकून देतो तूप नाही..
              अगदी तसच...

    आवडत्या माणसाने चूक केली तर
काहीही न बोलता ती पोटात घालतो पण

जर नावडत्याने केली तर आकांडतांडव
      करून बोभाटा करतो. 

'माझं' म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे ...
जग खुप 'चांगलं' आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे ...
 
सगळं विकत घेता येतं पण
संस्कार नाही।

समुद्र आणि वाळवंट कितीही आथांग आसले
तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही

देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।

               🙏🏻 *जय सद्गुरू* 🙏🏻

Thursday, 18 October 2018

ज्वारी =====

ज्वारी
=====

आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने पुरी, चपाती, नान किंवा पराठ्याचा समावेश असतो. रोज तेच खातायना मग आता ज्वारीच्या भाकरीची चव चाखा. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी असते. ती मध्यम तीव्रतेच्या फ्लेमवर भाजली जाते आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज नाही पण आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास हार्मोन्सचे असंतुलन होण्याची समस्या निर्माण होत नाही. ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रणात राहतो, असे अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. ज्वारीच्या भाकरीचे अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपणास नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शक्‍यतो ज्वारीचा आहारात समावेश करुन घ्याच.

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

ज्वारीचे फायदे -
1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.
2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.
3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.
4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.
5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.
6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.
7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.
8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.
9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.
10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.

ज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.

ज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर (गोड ज्वारीपासून) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषकमूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते. ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करण्याचे तंत्र कृषी विद्यापीठ, अन्न तंत्र विभाग, प्रक्रिया विभाग, संशोधन केंद्रांनी विकसित केले आहे.