खुपच सुरेख मेसेज आला आहे कोणाचा आहे माहित नाही चांगला आहे यासाठी शेयर करीत आहे
Khup chan aahe nakki vacha ..
देवाशी संवाद ............
माणूस : देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का?
देव : विचार ना.
माणूस : देवा, माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास. असं का केलंस तू देवा?
देव : अरे काय झालं पण ?
माणूस : सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .
देव : बरं मग ?
माणूस : मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा मिळाली .
देव : मग?
माणूस : आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण बेकार होतं .
देव : (नुसताच हसला )
माणूस : मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .
देव : बरं मग
माणूस : संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती.मी इतका थकलो होतो की ए .सी. लावून झोपणार होतो .
का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?
देव : आता नीट ऐक .
आज तुझा मृत्यूयोग होता. मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला. त्या गडबडीत अलार्म पण थांबला .
तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .
कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती. ते सँडविच वर निभावलं.
तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता.
संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .
माणूस : देवा मला क्षमा कर .
देव : क्षमा मागू नकोस. फक्त विश्वास ठेव. माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस . आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला
आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो.
मग *श्रवणाच्या* वेळी डुलक्या का येतात ?
तीन तासाच्या पिक्चर मध्ये जराही झोप येत नाही. ...
आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि
नको ते मेसेज फॉरवर्ड करतो.....
देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं
माणूस हा सवडीनुसार ,वागत असतो...!
चहात माशी पडली तर चहा फेकून देतो,
पण साजूक तूपात माशी पडली तर तो
माशी फेकून देतो तूप नाही..
अगदी तसच...
आवडत्या माणसाने चूक केली तर
काहीही न बोलता ती पोटात घालतो पण
जर नावडत्याने केली तर आकांडतांडव
करून बोभाटा करतो.
'माझं' म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे ...
जग खुप 'चांगलं' आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे ...
सगळं विकत घेता येतं पण
संस्कार नाही।
समुद्र आणि वाळवंट कितीही आथांग आसले
तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही
देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।
🙏🏻 *जय सद्गुरू* 🙏🏻
No comments:
Post a Comment