Sunday 9 December 2018

मृत्यू ही एक आनंदमय यात्रा !!!

मृत्यू ही एक आनंदमय यात्रा !!!

मनुष्याला आपल्या जीवा बद्दल अतिशय प्रेम असते ! थोड्याफार वेदना कष्टाने लाहीलाही होतो काही वेळा परमेश्वराला सुध्दा शिव्या देण्यात मागेपुढे बघत नाही  इतरांना तुच्छ मानणारे काही महाभाग तर अतिशय आपल्या जीवाला जपतात !!! भगवंताचे नाम घेण्यासाठी ही त्याला कष्ट वाटतात तो म्हणतो सहज व्हायला पाहिजे !! सहज होण्यासाठी देखील आपल्या मनाला त्या दिशेने कामाला लावावे लागते तरच सहज योगा घडतो
आजच्या या लेखात मृत्यू विषयी जाणुन घेऊ !!!अनेकांना एकच भ्रांत पडलेली असते ती म्हणजे भविष्यात काय होईल!!थोडाफार  मना विरुध्द घडना घडू लागले कि लगेचच आपले भवितव्य कसे होणार याच भितीने अनेकांना भविष्य जाणुन घेण्याची इच्छा निर्णायक होते मग तो अनेकांना आपले भविष्यकाळात काय होईल विचारण्यास सुरुवात करतो  
मनुष्य मृत्यूला फार घाबरतो !!! मृत्यू हा अनेक प्रकारामुळे होतो कोणी उंचावरुन पडुन कोणी गाडीखाली चेंगरुन कोणाचा खुन होऊन कोणी आजारी पणामुळे कोणी पाण्यात पडुन कोणी अग्निने भाजुन मरतो कोणी विजेमुळे कोणी श्वास कोंडल्याने कोणी गुदमरुन कोणी शाररिक दुखण्यामुळे कोणा जनावरामुळे विषामुळे असे प्रकारात अतिशय भयंकर वाटणारा मृत्यू कसा असतो? तो केव्हा येतो याचे परमेश्वराने अतिशय सुरेख यंत्रणाच उभी केलेली आहे ही यंत्रणा माणसाला सर्व काही अगोदरच संकेत स्वप्नं दृष्टान्तातून दाखवतो परंतु सामान्य माणासाला त्या खुणा कळुन येत नाही किंवा त्याची ओळख आपल्याकडे नसते त्यामुळे तो मनुष्य भिनदास्त होतो
मृत्यू जवळ येऊन टेकतो तरी याचा पुर्णपणे दुर्लक्ष होते त्यामुळे तो सजक राहत नाही !
मृत्यू समयी माणसाचे सहावे इंद्रिये जागृत अवस्थेत येते व शरारातील पाच इंद्रियांचे काम बंद पडते त्यामुळे संपुर्ण अंधारात शरीर हरवुन जाते त्यामुळेच सारे जग डुबल्या सारखे होते आपण ज्या वेदने मुळे मृत्यू होत असतो त्यावेळी शरीरातील आत्मा केवळ ओरडत राहतो त्याला वाटते कोणीतरी मला वाचविण्यासाठी तरी येईल पण त्याला कळतच नाही आपला मृत्यू झालाय!! तो नुसता त्या अंधा-या कोठणीत शोधत राहतो कोणीतरी येईल या संकटातुन बाहेर काढेल!!! हीच आशा त्याला लागलेली असते त्याला कळत असते मी मोठ्याने ओरडत आहे पण त्याला दिसत नसते बाहेरील काहीही ऐकू येत नसते जे काही असते ते गर्द अंधार आहे मी आत्ता मरणार हे त्याला कळत असते त्या भितीने तो जोरजोराने ओरडत असतो पण त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाला देखिल त्याचे ओरडणे ऐकू येत नाही तो आता फक्त आत्मा बननुन राहिलेला असतो त्याचा स्थुल शरीर त्याला दिसत नाही त्या स्थुल शरीराचा स्पर्श देखील जाणवत नाही यालाच मृत्यू अवस्था म्हणतात या अवस्थेत स्थुल जगताचा संपुर्ण संबंध संपुष्टात येतो त्याला सर्व कळत असते पण त्याला स्थुल जगातील कोणताही संदेश त्याला ऐकू येत नाही संपुर्ण काळोखात एकटाच असल्यामुळे त्याला काय करावे कळत नाही अश्या वेळेस शांत होऊन फक्त देवा मी मेलो रे वाचव मला असे म्हणातच क्षणी तो दिव्य प्रकाश दिसु लागतात व पुन्हा स्थुल जगताचा संबंध येतो व सारे सखेसंबंध आपल्या भोवती असे गोळा का झालेत तो वेड्यासारखा स्वतःला व लोकांना डोळे भरुन पाहतो पण मृत्यू भोगल्यामुळे तोच अनुभवाने सांगू  शकतो मृत्यू हा आनंदाचा क्षण आहे या मृत्यू समयी मनुष्याच्या सर्व इंद्रिये वरील ताबा नष्ट झाल्याने तो निसर्ग आपल्याकडे घेतो त्यामुळे तुम्हाला कोणत्याही वेदना होत नाही अचानक काळोखात विलिन झाल्यावर आत्मा घाबरतो त्यामुळे त्याच्या शरीराच्या हालचाली दिसतात पण मृत्यू मधून वाचल्यानंतर मात्र अंत्यंत वेदना सहन कराव्या लागतात शरीर विद्रुप सुध्दा होऊ शकते म्हणूनच अनेक संत सांगतात अरे बाबांनो त्या भगवंताच्या अडवणीत जगा तोच मोक्षाचे व्दार आहे या संकटातून सर्वांना जावे लागते  कोणी टिकतो कोणी अंनंत ब्रम्हाडांत भटत राहतो मृत्यू समयी ज्या विचारात राहतो त्याचाच शोध घेत  फिरत राहतो ज्या क्षणी भगवंताचे आडव होतो तेव्हाच त्या काळोख्या पेटा-यातून सुटका करुन घेता !!!!
याचे अनुभव स्वतःला अनुभव घ्यायचे असल्यास गर्द अंधार असलेल्या रुम मध्ये एकटेच बसा अंधार पडल्यानंतर तुमचे शरीर तुम्हाला डोळ्याला दिसले नाही पाहिजे कोणताही आवाज येता कामा नये फक्त १० मिनिटात तुम्हाला स्वतःची ओळख होईल ! आत्मा काय आहे ? शरीर काय आहे? स्थुल काय सुक्ष्म शरीर काय याची ओळख तत्काळ तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही !!!!

No comments:

Post a Comment