*भावना कळायला मन लागतं,*
*वेदना कळायला जाणीव लागते,*
*देव कळायला श्रद्धा लागते,*
*माणूस कळायला माणुसकी लागते,*
*चांगलं जगायला सुंदर विचार लागतात,*
*आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी, समाधानी, निरामय आयुष्य लागतं*
*भावना कळायला मन लागतं,*
*वेदना कळायला जाणीव लागते,*
*देव कळायला श्रद्धा लागते,*
*माणूस कळायला माणुसकी लागते,*
*चांगलं जगायला सुंदर विचार लागतात,*
*आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी, समाधानी, निरामय आयुष्य लागतं*
*गुरुदत्तकथा*
*एकदा दत्ताने त्यांच्या शिष्यांना विचारले, " आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?". सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दिले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे*
*नियंत्रण हरवुन बसतो,*
*आणि म्हणुनच कदाचीत ओरडून बोलतो."*
*यावर दत्त म्हणाले, " पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्दा,,,,आपण ओरडतो। जरी सौम्य आणि मृदु* *आवाजात बोलणे शक्य असले तरीदेखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो".*
*यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याच उत्तराने दत्तांचे समाधान झाले नाही.*
*शेवटी दत्तांनी स्वतःच उत्तर दिले. ते म्हणाले , " जेव्हा दोन व्यक्ती* *एकमेकांवर रागावलेल्या असतात*
*तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन* *काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात."*
*"आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतिशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?"*
*असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले,"*
*कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर*
*कमी झालेले असते. आणि जसजसे दोन प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही.*
*फक्त नजरेतुनच किंवा देहबोलीतूनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.*
शिकवण - *परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतच राहतात मात्र कितीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढु देऊ नका.तसे होऊ दिल्यास दोन व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होईल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही..*