"श्री स्वामी समर्थ" ⚘👏
सेवेकरी कसा असावा संपूर्ण वाचावे हि विनंती.
१) अडचणीत सापडलेल्या गरजू व्यक्तींना तसेच अपंगांना मदत करणे हे सेवेकरी धर्म आहे.
२) आपल्याकडून जी पण काही मदत होत असते ती स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात
३)आपण केलेले कार्य स्वामींना समर्पित करणे म्हणजे निस्वार्थी भावनेने केलेले कार्य समजावे.
४) आपण गरजुंना केलेल्या मदतीचा उल्लेख करणे अथवा ज्याला सहकार्य केले त्याच्याकडून स्वतःच्या स्तुतीची अथवा आपण एखाद्यावर फार मोठे उपकार केले आहेत असे समजून घेणे म्हणजे स्वतःतील अहंकार वाढल्याचे लक्षण होय.
५)जो स्वतःला सेवेकरी मानतो तो कधीही कळत नकळत दुसऱ्याचे मन दुखणार नाही अश्या गोष्टी करत असतो स्वतः त्रास सहन करून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम करत असतो.
६)कधीही कोणाला खाऊ घातलेले अथवा आर्थिक मदत केलेले वारंवार काढणे म्हणजे स्वतःच्या संपत्तीचा अहंकार आला आहे असे समजावे
७) कोणाची ही मजाक करणे कमी समजणे त्याची निंदा नालस्ती करणे सतत नाव ठेवणे टाकून पडून बोलणे हे सेवेकऱ्यांची लक्षणे नसतात.
८)लहानापासून ते मोठ्या वृद्ध व्यक्तीं पर्यंत प्रत्येकासोबत विनम्रतेने वागावे आणि त्यांचा आदर करावा.
९) ज्यावेळेस आपण कोणालाही केलेली मदत काढत असतो तसेच कोणाची ही मजाक निंदा करत असतो आपण केलेली सर्व सेवा त्या व्यक्तीकडे जात असते आणि आपण नंतर असे म्हणतो कि आम्ही कितीही सेवा केली तरी आमची समस्या सुटत नाही म्हणून स्वामींना तुमच्या सेवेबरोबर मन आणि चारित्र्य देखील समर्पित करा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा.
१०)प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात म्हणून कोणाबद्दल हि खरी परिस्थिती न जाणता आपले चुकीचे मत गैरसमज आपणच स्वतःच्या मनात निर्माण करू नये त्या मुळे आपण सतत त्वेषाच्या अग्नीत जळत असतो ह्याचा मानसिक तसेच शारीरिक त्रास स्वतःलाच करून घ्यावा लागतो.
११)आपण एकच गोष्ट लक्षात ठेवावी आपल्या पण अडचणीच्या काळात कधीतरी आपणाला कोणी तरी मदत केली आहे आणि ती स्वामींमुळे ती झाली आहे म्हणूनच आज आपण दुसऱ्या कोणाला तरी मदत करण्याच्या परिस्थितीत आहोत हे समजावे त्यामुळे आपण कादिही स्वतःत अहंकार निर्माण करून घेऊ नये.
१२)कधीही कोणालाही खाऊ घातलेले काढणे तसेच माझ्यामुळेच त्याचे सर्व चांगले झाले हे म्हणत राहणे आपण केलेल्या सर्व मदतीचे पुण्य कमी करणे असते.
१३)केलेल्या मदतीची काहीतरी परत फेड मिळावी म्हणून अपेक्षा ठेवने ह्याला स्वार्थी मदत समजावी तसेच एखाद्याला जाणून बुजून त्रास देणे त्यांच्या पाठीशी कधीही स्वामी नसतात हे समजावे
म्हणून
।। कर्ता आणि करविता तूंचि एक समर्था । माझिया ठायी वार्ता मी पणाची नसेची
ह्या प्रमाणे जीवन जगावे तेव्हाच स्वामी कृपा होत असते.
"स्वामी ॐ माऊली" ⚘👏
"श्री गुरुदेव दत्त"⚘👏