Thursday 28 June 2018

๐Ÿ™ เคœเคฐुเคฐ เคตाเคšा ๐Ÿ™ *เคงเคจ เคฎ्เคนเคฃเคœे เค•ाเคฏ...? - เคเค• เคธुंเคฆเคฐ เคตिเคšाเคฐ* --

🙏  जरुर वाचा  🙏

*धन म्हणजे काय...? - एक सुंदर विचार*
------------------------------------------
*वडीलांनी घरी आल्यावर आपल्याला पुर्ण वेळ द्यावा असे जेव्हा मुलांना वाटते तेव्हा वडीलांनी टि.व्ही.बंद करुन आणि स्मार्टफोन बाजुला ठेवुन मुलांना दिलेला 100% वेळ हे मुलांचे - "धन"*.. ..

*वैवाहिक आयुष्यातील 20 वर्ष पुर्ण झाल्यावर सुध्दा जो आपल्या पत्नीला तीच्या गुणदोषासकट स्विकारुन सांगतो "माझ तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे" तो क्षण म्हणजे पत्नीचे - "धन"*...

*आपल्या मुलाने आपली देखभाल करावी असे वार्धक्यामुळे थकलेल्या आई-वडीलांना जेव्हा वाटते आणि तेव्हा मुलगा ती इच्छा पुर्ण करतो,तो क्षण म्हणजे आई-वडीलांचे - "धन"* ...

*ह्या तीनही क्षणांचा त्रिवेणि संगम ज्या च्या आयुष्यात होतो ते खरे "धनवान"*...
==============================
=============================
           आपल्यापैकी सगळ्यांचेच *आयुष्य मर्यादित आहे* आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही .!
           *मग जीवनात खुप काटकसर* कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत .
           *आपण गेल्यानंतर पुढे काय होणार* याची मुळीच चिंता करु नका . कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ?        
           *जीवनाचा* आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल ...!
           *तुमच्या मुलांची* खुप काळजी करु नका . त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या . स्वतःचे भविष्य घडवू द्या . त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका .
           *मुलांवर प्रेम करा*, त्यांची काळजी घ्या , त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर , स्वतःच्या आवडी निवडीवर करा .
           *जन्मापासून मृत्युपर्यंत* नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही , हे देखील लक्षात ठेवा .
             *तुम्ही कदाचित* चाळीशीत , पन्नांशीत किंवा साठीत असाल , आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत . पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही .
             *या वयात* प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात . पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल . तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !
           *एक दिवस* आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात  एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात , हे लक्षात असू द्या.
            *आणखी एक गोष्ट* तुमचा स्वभाव खेळकर , उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल , आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल , तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत .
            *सगळ्यात महत्वाचे* म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा . त्याची जपणूक करा आणि हो ! तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका , त्यांना जपा . हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
           *मित्र नसतील तर* तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणतो .... *आयुष्य खुप कमी आहे* , ते आनंदाने जगा ...